ओटीटीवर आता चालणार सेन्सॉरची ‘कात्री’; नियमावली तयार, हिवाळी अधिवेशनात विधेयक

विविध ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) कटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली : विविध ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) कटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. नवे विधेयक मंजूर झाल्यास नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि डिस्ने + हॉटस्टारवर प्रकाशित होणाऱ्या कटेंटचे देखील नियमन होणार आहे.

    अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ आणि ‘इझ ऑफ लिव्हिग बाबत दुरदृष्टी बाळगतात. ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस (रेग्युलेशन) विधेयकाचा मसुदा समोर आणताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. नव्या कायद्यानुसार, ‘मजकूर मूल्यमापन समिती’ स्थापन केली जाईल. या समितीमध्ये तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

    भविष्याच्या दृष्टीकोणातून नव्या कायद्याचा मसुदा आखण्यात आला आहे. जाहिरात कोड आणि प्रोग्रॅम कोड यांमधील उल्लंघनासंबंधी सरकारला सल्ला देण्यासाठी नवीन ब्रोडकास्टिंग सल्लागार परिषदेची स्थापना केली जाणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.