देशात पेट्रोल-डिझेल महागणार (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: राज्यात रोज लाखो लोक स्वतःच्या वाहनाने एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला स्वतःचे वाहन वापरतात. मात्र आता आशा नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात देखील लवकरच दर लागू होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्यूटीत 2 रुपये प्रती लीटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे 8 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत अस्थिरता आहे. त्यातच आता केंद्र सरकारने उचलले हे पाऊल पाहता सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. रोज वाहनाने प्रवास करतात आणि जे वाहतूक प्रवाशाशी संबंधित आहेत, त्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.
Central Government raises excise duty by Rs 2 each on petrol and diesel: Department of Revenue notification pic.twitter.com/WjOiv1E9ch
— ANI (@ANI) April 7, 2025
एक्साइज ड्यूटी म्हणजे काय?
पेट्रोल आणि डिझेलवर आकारली जाणारी एक्साइज ड्यूटीहा केंद्र सरकारकडून लावण्यात आलेला कर आहे. या करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत असतात.
हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मोठी मागणी
जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते. मग आता तर क्रूड ऑईल ६५ डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत.
पेट्रोलचा दर 51 रुपये अन् डिझेलचा…; हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मोठी मागणी
युपीए सरकार असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजपा सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला, काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्स मध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलिंडरसुद्धा ४०० ते ४५० रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.