भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं (ISRO) ऐतिहासिक मिशन चांद्रयान 3 (Chandrayaan-3) पूर्णत्वाच्या टप्प्यावर आलेलं आहे. शनिवारी सायंकाळी 7.15 वाजता चांद्रयान 3 यानाने चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, अशी माहिती इस्रोने दिली. आता याबद्दल एक मोठी अपडेट इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रेवश केल्यांनतर चंद्राचा पहिला फोटो (Chandrayaan-3 moon photo) पाठवला आहे.
[read_also content=”दारुच्या नशेत पठ्ठ्यानं थेट बॉसलाच केला मेसेज; मग काय,बॅासनं मेसेज वाचला अन्…स्क्रीनशॉट व्हायरल https://www.navarashtra.com/viral/boss-receives-drunk-text-from-employee-people-said-add-this-to-your-cv-nrps-441525.html”]
गेल्या 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत चांद्रयानाने सुरळीत प्रवास केला आहे. 1 ऑगस्ट रोजी यानाने क्रिटिकल ट्रान्स- लुनार इंजेक्शन (टीएलआय) पूर्ण केले होते. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा केल्यानंतर, चांद्रयान-3 ने शनिवारपासून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 40 हजार किलोमीटक दूर आहे चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर चांद्रयानने त्याचे पहिले फोटो पाठवले आहे. इस्रोने त्यांच्या ट्विटर पेजवरुन ते शेयर केले आहे.
The Moon, as viewed by #Chandrayaan3 spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023.#ISRO pic.twitter.com/xQtVyLTu0c
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 6, 2023
14 जुलैला चांद्रयान अवकाशात झेपावल्यापासून त्याचा आतापर्यंतचा प्रवास हा अत्यंत आव्हानात्मक होता. पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे म्हणजे चांद्रयाने मोठी कामगिरी पार पाडल्याचं बोललं जात आहे. आता येत्या 23 ऑगस्ट रोजी यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. येत्या 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि 23 ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.
स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. चांद्रयान 3 मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. 16 ऑगस्टपर्यंत हे आता चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल.