Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest : सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा

केंद्र सरकारने CJP च्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर जंतर-मंतरवरील महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारसोबत तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर CJP ने आंदोलनकर्त्यांना शांततेने घरी परतण्याचे आवाहन केले असून शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 06:22 PM
सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा

सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • CJP च्या तीनही मागण्या सरकारकडून मान्य
  • CJP कडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा
  • आंदोलनकर्त्यांना घरी परतण्याचे आवाहन
Jantar Mantar Protest News Marathi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. सरकारने पक्षाच्या तीनही प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा CJP ने केला आहे.

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तात्काळ शांततेच्या मार्गाने आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी परतावे, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातील रणनीतीबाबत आणि इतर मुद्द्यांबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही आंदोलनकर्त्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आणि ठरलेल्या कालमर्यादेत अटींची अंमलबजावणी होईल, या अपेक्षेने आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी NEET परीक्षेशी संबंधित आत्महत्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती दिली. CJP ने या कुटुंबांना १ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर सरकारने कायदेशीर तरतुदींनुसार सन्मानजनक आर्थिक भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे आशुतोष रांका यांनी सांगितले.

याशिवाय, CJP ने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करण्यासाठी सरकारसमोर पाच सूत्री मागण्यांचे निवेदनही सादर केले आहे. या मागण्यांवर पुढील चार आठवड्यांत पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले.

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आले. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांसंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मुद्द्यांवर तत्त्वतः सहमती झाली असून, त्यावर लेखी उत्तर मिळण्याची त्यांना आशा आहे. ४७ एनटीए अधिकाऱ्यांना हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरही रांका यांनी प्रतिक्रिया दिली.

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…

Web Title: Cjp withdraws jantar mantar protest after centre accepts three demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…
1

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?
2

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…
3

‘मी स्वतः मोदींना भेटलो’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा, ‘त्या’ चर्चेच्या परिणामांमुळेच…

Education Minister Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साताऱ्यात पेढे वाटून तरुणांचा साजरा जल्लोष
4

Education Minister Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; साताऱ्यात पेढे वाटून तरुणांचा साजरा जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.