नवी दिल्ली: नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या दरामध्ये (LPG Rates) घट झाली आहे. केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (Commercial Cylinder Price) ही कपात झाली आहे. आज १ नोव्हेंबर २०२२ पासून १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेंडर ११५.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलेंडरची किंमत ६ जुलैपासून स्थिर आहे.
[read_also content=”भारताचे स्टिल मॅन जे. जे. इराणी यांचं निधन https://www.navarashtra.com/india/steel-man-of-india-j-j-irani-passed-away-nrsr-340819.html”]
दिल्लीत १९ किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता १७४४ रुपये झाली आहे. हा दर आधी १८५९.५ रुपये इतका होता. मुंबईत १८४४ मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता १६९६ रुपयांना मिळणार आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता १८९३ रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी २००९.५० रुपये मोजावे लागत होते. आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १८४६ रुपये असेल, जी आधी १९९५.५० रुपये होती.
जनतेला दिलासा देत सरकारनं व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ११५.५० रुपयांनी कमी केली आहे.
दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत १०५३ रुपये आहे. तर १४.२ किलोचा सिलेंडर कोलकात्यात १०७९ रुपये, चेन्नईमध्ये १०६८.५ आणि मुंबईत १०५२ रुपयांना उपलब्ध आहे. भारतातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात.