कर्नाटक विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत भरघोस मतं मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चागंलीच चढाओढ सुरू झालेली आहे. नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या वतीने (BJP)निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आता त्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही (Congress) कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka elections) आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसने सरकार आल्यास बजरंग दल (Bajrang Dal) आणि पीएफआयवर (PFA) बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्यासह कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. तसेच महिला मतदारांनाना आकर्षित करण्यासाठी महिलांना राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही दिले आहे.
[read_also content=”मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल होत आहेत हायटेक! वाहनचालकांच्या सोयीसाठी नवे 550 एलईडी ट्रॅफिक सिग्नल https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/traffic-signals-in-mumbai-are-becoming-hi-technew-652-led-traffic-signals-for-the-convenience-of-motorists-nrps-393864.html”]
मतदारांना आकर्षित करण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने नवे नवे प्रयत्न केले जात आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांना मानधानत वाढ करण्याच आश्वासन दिलं. अंगणवाडीचे पगार 15 हजार रुपये, मिनी अंगणवाडीचे 10 हजार रुपये आणि आशा सेविकांचे वेतन 8 हजार रुपये केले जाईल, असे आश्वासन त्यांनी केले. एवढेच नाही तर अंगणवाडीतून सेवानिवृत्तीनंतर 3 लाख रुपये आणि मिनी अंगणवाडीतून निवृत्तीनंतर 2 लाख रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले होते.
दारिंद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलिंडर प्रदान करणार
महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ स्थापन करणे
बीपीएल कुटुंबाला दररोज अर्धा लिटर ‘नंदिनी’ दूध आणि पाच किलो मासिक रेशन किट
कर्नाटकात 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.






