Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Breaking News : तीन तासांत दिल्ली हादरणार…! विधानसभेला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

Delhi Bomb Blast threat : दिल्ली विधानसभेला एकदा बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाली असून पुढील तीन तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 03:57 PM
Delhi Assembly Bomb Threat IED detonated within three hours delhi breaking marathi news

Delhi Assembly Bomb Threat IED detonated within three hours delhi breaking marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली विधानसभेला बॉम्ब उडवण्याची धमकी
  • तीन तासांत त्यांचा स्फोट घडवून आणण्याचा दावा
  • डीएमकेपासून दूर राहण्याचा इशारा
 

Delhi Bomb Blast threat : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे दिल्लीतील (Delhi News) सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आली आहे. आज (दि.13) ईमेलद्वारे पाठवलेल्या या धमकीच्या संदेशात, १५ आरडीएक्स आयईडी बॉम्ब वापरुन तीन तासांत त्यांचा स्फोट (Delhi Blast) घडवून आणणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशात, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांना तामिळनाडूच्या सत्ताधारी प्रादेशिक पक्ष, डीएमकेपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

ईमेलवर आलेल्या या मेसेजमध्ये दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये लिहिण्यात आले की, कोणत्याही ब्राह्मणाने डीएमकेमध्ये सामील होऊ नये. जर ते सामील झाले, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी नग्न अवस्थेत ‘पेरियार-आंबेडकर जिंदाबाद’ची घोषणा करावी लागेल, असे या धमकीच्या मेलमध्ये लिहिण्यात आले आहे.

हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर BJP ला दणका! सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुलमध्ये प्रवेश; म्हणाले, “भारताला वाचवण्यासाठी…”

‘सायनाइडने भरलेले १५ आरडीएक्स बॉम्ब ३ तासांत फुटतील’

त्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले आहे, “३ तासांत, तुमच्या दिल्ली विधानसभा कार्यालयात सायनाइड वायूने ​​भरलेले १५ आरडीएक्स बॉम्ब फुटतील. फक्त सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तेथून तात्काळ काढून टाकावे.” या धमकीच्या ईमेलमध्ये एस. व्ही. शेखर यांचे नाव घेऊन एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. त्या ईमेलमध्ये लिहिले आहे, “एस. व्ही. शेखर हे एक ब्राह्मण आहेत जे डीएमकेमध्ये सामील झाले आहेत. आता तुमची विधानसभा उडवून दिली जाईल कारण तुम्ही त्यांना भाजपचे ब्राह्मण एजंट म्हणून दक्षिण भारतात आणि डीएमकेमध्ये पाठवले आहे.” असे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलीस पथक तपास सुरु

धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. दिल्ली पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण विधानसभा परिसराची कसून तपासणी केली. सध्या तपास सुरू असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता म्हणाले की, या प्रकरणात दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने प्रत्येक बाजूने तपास व्हायला हवा.

हे देखील वाचा :  सॅलरीवरुन नोएडामध्ये पेटला वाद! पगारवाढीसाठी जाळपोळ अन् तोडफोड

यापूर्वी, २५ मार्च रोजी विधानसभेला बॉम्बची धमकीही मिळाली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी सभागृहाला माहिती दिली की, अध्यक्षांच्या कार्यालयाला एक ईमेल मिळाला होता. त्या ईमेलमध्ये १६ आरडीएक्स आयईडी ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर 15 दिवसांमध्ये पुन्हा एकदा मेल आला आहे. सततच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे.

 

Web Title: Delhi assembly bomb threat ied detonated within three hours delhi breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Blast in Delhi
  • Delhi news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.