Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणात निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्रात आप कार्यकर्त्यांवरील अनेक हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. “भाजप कार्यकर्ते सतत आप कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत. दिल्ली पोलिसही यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, त्यामुळे वातावरण बिघडत चालले आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
वयाच्या तिशीनंतर आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचा समावेश, शरीराला होतील अनेक
दिल्लीतील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याबाबत आप आणि भाजपमधील राजकीय संघर्ष वाढत आहे. अलिकडेच अनेक भागात आप कार्यकर्ते आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. भाजप समर्थक त्यांच्या पक्षाच्या स्वयंसेवकांवर उघडपणे हल्ला करत आहेत, असा आरोप ‘आप’ने केला आहे. भाजप कार्यकर्ते आपचे पोस्टर आणि बॅनर फाडत आहेत, परंतु पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत. पण उलटपक्षी, भाजप नेते म्हणतात की आप स्वतःच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्लीत निष्पक्ष आणि शांततेत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगासाठी एक मोठे आव्हान बनत आहे. जर ‘आप’चे आरोप खरे असतील तर ते लोकशाही प्रक्रियेला गंभीर धोका निर्माण करू शकते. आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इस्त्रायलचे नवे लष्करप्रमुख म्हणून करण्यात आली ‘या’ व्यक्तीची निवड; पंतप्रधान नेतन्याहूंशी आहे संबंध
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करावी.
निवडणूक आयोगाने आप कार्यकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी.
‘आप’ कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे.
हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करावी.
तसाच, एक व्हिडिओ रीट्विट करतांना अरविंद केजरीवाल यांनी लिहिले, “ हे घ्या. अमित शाहांना गाण गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या देशाच्या तरुणांनाही भीती वाटायला लागली आहे. जेव्हा कोणत्याही सत्तेला तरुणांपासून भीती वाटू लागते, तेव्हा हे सत्तेच्या अखेरच्या दिवसांचा संकेत असतो.” नवी दिल्ली येथून निवडणूक लढत असलेले केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा जागा जिथे चौथ्यांदा अरविंद केजरीवाल लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित आहेत. या जागेवर त्रिकोणीय लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. तीनही पक्षांचे उमेदवार दावा करत आहेत की, जिंकणे त्यांचेच निश्चित आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी या 70 विधानसभा जागांवर निकाल जाहीर होणार आहेत.