शरीरासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. शरीरातील हाडे, दात, स्नायू इत्यादी निरोगी राहण्यासाठी शरीराला कॅल्शियम आवश्यक आहे. मात्र शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. वयाच्या तिशीनंतर शरीरामध्ये अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वयाच्या तिशीनंतर आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कॅल्शियम वाढण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
कॅल्शियम वाढवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
कॅल्शियम युक्त बदामाचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित २ किंवा ३ बदाम खाल्यास शरीराला कॅल्शियम मिळेल. शरीरात कमी झालेले कॅल्शियम वाढवण्यासाठी बदाम दूध प्यावे.
टोफूमध्ये कॅल्शियमचा स्रोत मुबलक प्रमाणात आढळून येतो. जे लोक दुधापासून बनवलेले पदार्थ खात नसतील अशा लोकांसाठी टोफु हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. टोफूमध्ये प्रोटीन सुद्धा आढळून येते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीरपासून बनवलेले पदार्थ आवडतात. पनीर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीनसुद्धा आढळून येते, ज्यामुळे स्नायूंना अनेक फायदे होतात.
दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही नियमित वाटीभर दह्याचे सेवन करू शकता. दही खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते.
कॅल्शियम वाढवण्यासाठी नियमित दुधाचे सेवन करावे. नियमित एक ग्लास दूध प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. एका ग्लास दुधात सुमारे 300 मिग्रॅ कॅल्शियम असते. याशिवाय दुधात विटामिन डी सुद्धा आढळून येते.