Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा धक्का! सोशल मीडिया अकाऊंट सुरू करण्यास कोर्टाचा नकार

Cockroach Janta Party:कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) ‘एक्स’ हँडल २१ मे रोजी भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर ‘कॉकरोच इज बॅक’ नावाचे नवीन हँडल तयार करण्यात आले असून, त्याला सध्या २.२७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 29, 2026 | 03:04 PM
Delhi High Court, Cockroach Janta Party, CJP News,

Delhi High Court, Cockroach Janta Party, CJP News,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कॉकरोच जनता पार्टी;s ‘X’ हँडल ब्लॉक
  • अभिजीत दीपके यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि ‘X’ प्लॅटफॉर्मला न्यायालयाची नोटीस
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीला (CJP) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी (२९ मे) न्यायालयाने अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपी’चे सोशल मीडिया अकाऊंटचे खाते तात्काळ पुनर्संचयित म्हणजेच पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर यांनी दीपके यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली.

न्यायालयाला सीजेपीच्या सोशल मीडिया खात्यांवरील काही पोस्ट ‘आक्षेपार्ह’ वाटल्याने संस्थापक अभिजीत दीपके यांच्या याचिकेला तातडीचा दिलासा देण्यास नकार देण्यात आला. ” या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असून केंद्र सरकार आणि ‘एक्स’ प्लॅटफॉर्मची बाजू ऐकल्यानंतरच पुढील आदेश दिले जातील.”असे न्यायालयाने म्हटले आहे.

Cockroach Janta Party वर सरकारचा आणखी एक ॲक्शन? एक्सनंतर वेबसाईटही बंद

उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेनुसार CJP पक्षाच्या ‘एक्स’ हँडलवरील बंदीला आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने भारतात हे ट्विटर खाते ब्लॉक केल्याचे सांगितले आहे. मात्र, न्यायालयाने तत्काळ बंदी उठवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.

सीजेपीचे ‘एक्स’ हँडल २१ मे रोजी ब्लॉक

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) ‘एक्स’ हँडल २१ मे रोजी भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर ‘कॉकरोच इज बॅक’ नावाचे नवीन हँडल तयार करण्यात आले असून, त्याला सध्या २.२७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका वकिलाच्या वरिष्ठ दर्जासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ या वक्तव्यांनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पूर्वी आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या अभिजीत दीपके यांनी १५ मे रोजी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) स्थापन केली होती.

Cockroach Janta Party: ‘ते आपल्या एका चुकीची वाट पाहत आहेत’; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ

१६ मे रोजी सीजेपीची स्थापना

१६ मे रोजी स्थापन झालेल्या सीजेपीचा दावा आहे की, “तरुणांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडणे आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र युवा चळवळ उभी करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. अलीकडेच पक्षाने शिक्षण क्षेत्रातील कथित प्रणालीगत अपयश आणि नीट-यूजी २०२६ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, १६ मे रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांच्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. “मी तरुणांवर टीका केली नव्हती. माझी टिप्पणी विशेषतः बनावट आणि बेकायदेशीर पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांविरोधात होती,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माध्यमांच्या एका वर्गाने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

Web Title: Delhi hc refuses immediate relief to cockroach janta party x account to remain blocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • delhi high court
  • Social Media

संबंधित बातम्या

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?
1

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?

Vasai Virar News : पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द? Social Media वरील मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण
2

Vasai Virar News : पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द? Social Media वरील मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड
3

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
4

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.