नवी दिल्ली : गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत (Loksabha and Rajyasabha) अभूतपूर्व असा गदारोळ व गोंधळ पाहयला मिळाला. दरम्यान, २०१४ नंतर सत्तेत आलेल्या भाजपाने (BJP) पहिल्यांदा अधिवेशनात आंदोलन केल्याचे पाहयाला मिळाले. काँग्रेसचे लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan choudhari) यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हटलं होतं”. याचे आज सभागृहात पाहयला मिळाले. भाजपच्या महिला खासदारांनी गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ, व गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. तसेच संसदेच्या बाहेर भाजपाने पहिल्यांदा आंदोलन केले. सभागृहात स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी अधीर रंजन (Adhir Ranjan) यांच्या वक्तव्यासाठी काँग्रेसला दोषी ठरवले आणि सोनिया गांधींना (Sonia Gandhi) माफी मागावी अशी मागणी केली. यावरुन गदरोळ झाला, व कामकाज तहकूब करावे लागले.
[read_also content=”वीजदर कमी या राज्य सरकारच्या निर्णयाचा ग्राहकांना तोटा, यामागे ‘काय आहे नेमकं कारण’ नक्की वाचा https://www.navarashtra.com/maharashtra/state-government-decision-to-lower-electricity-rates-but-loss-to-consumers-read-what-is-reasons-309060.html”]
दरम्यान, संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या संसदेच्या आवारात ऐकमेकांसमोर आले. यावेळी या दोन नेत्यांमध्ये वाद झाला तेव्हा, सोनिया गांधी स्मृती इराणींना म्हणाल्या की, “डोंट टॉक टू मी” तसेच निघून जाताना सोनिया म्हणाल्या की, अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे, पण या प्रकरणात माझे नाव का घेण्यात आले? असं म्हणत सोनिया गांधी निघून गेल्या.