Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED on Vinesh Chandel : बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक

ED arrest I-PAC Vinesh Chandel : अवैध खाणकाम प्रकरणातून ईडीने आय-पॅक'चे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना अटक केली आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 11:38 AM
ED arrest I-PAC Vinesh Chandel in money laundering probe-bengal marathi news

ED arrest I-PAC Vinesh Chandel in money laundering probe-bengal marathi news

Follow Us
Follow Us:
  • I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक
  • ईडीची I-PAC वर कारवाई
  • ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का
ED arrest I-PAC Vinesh Chandel : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार केला जात असून तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED Action) ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीती संघटना ‘आय-पॅक’चे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना अटक झाल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात (Political News) खळबळ उडाली. ही कारवाई बंगालमधील कुप्रसिद्ध कोळसा घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामुळे गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारण तापले आहे.

विनेश चंदेल यांना ईडीने दिल्लीत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली. आसनसोलजवळील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींमधून कोट्यवधी रुपयांच्या कोळशाची चोरी झाल्याचा आरोप करत, नोव्हेंबर २०२० मध्ये सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधून हे प्रकरण उद्भवले आहे. यापूर्वी त्यांच्या ऑफिसवर झालेल्या छापेमारीवरुन वाद निर्माण झाला होता. ममता बॅनर्जी यांनी थेट ईडीच्या विरोधात केस दाखल केली होती. यानंतर आता पुन्हा ईडीने या प्रकरणावरुन विनेश चंडेल यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हे देखील वाचा : कर्मचाऱ्यांच्या हिंसक आंदोलनांनंतर आली सरकारला जाग! नोएडामध्ये किमान वेतनात २१% वाढ जाहीर

तपास यंत्रणांचे काय आहे म्हणणे? 

अवैध खाणकामातून मिळालेल्या पैशांचा मोठा हिस्सा हवालामार्फत मनी लाँड्रिंग करण्यात आला, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. चंडेलच्या दिल्लीतील निवासस्थानांवर छापे टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, यावरून हे स्पष्ट होते की तपास आता पडद्यामागे राहून सत्तेचा वापर करणाऱ्या रणनीतिकारांपर्यंत पोहोचला आहे.

हवालामार्फत कोट्यवधी रुपयांचा दावा

तपास यंत्रणेने उघड केलेली तथ्ये अत्यंत धक्कादायक आहेत. ईडीचा दावा आहे की, या कोळसा तस्करी सिंडिकेटशी संबंधित एका हवाला ऑपरेटरने ‘आय-पॅक’ (I-PAC) नावाने नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडे कोट्यवधी रुपये वळवले. तपासात मुंबईस्थित ‘अंगडिया’ फर्ममार्फत सुमारे २० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही तीच फर्म आहे जी दिल्लीतील दारू घोटाळ्यातही तपास यंत्रणांच्या रडारवर होती. केवळ विनेशच नाही, तर ‘आय-पॅक’चे दुसरे संचालक ऋषी राज सिंग आणि आम आदमी पक्षाचे माजी संपर्क प्रभारी विजय नायर यांच्या निवासस्थानांचीही या महिन्यात झडती घेण्यात आली.

हे देखील वाचा : Monsoon 2026 Prediction: यंदा पाऊस कमी पडणार? हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर; ‘एल निनो’मुळे चिंतेचे ढग

बंगाल सरकार आणि ईडी यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात 

जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः कोलकाता येथील एका छाप्याच्या घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा या प्रकरणाला मोठे वळण लागले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, जिथे न्यायालयाने केंद्रीय यंत्रणांच्या कामात सरकारी यंत्रणांचा हस्तक्षेप “अत्यंत गंभीर” मानला.

 

Web Title: Ed arrest i pac vinesh chandel in money laundering probe bengal marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • ED Action
  • Mamata Banerjee
  • West bengal

संबंधित बातम्या

West Bengal Politics: आकडे फिरणार! ममता बॅनर्जींनी ‘हा’ निर्णय घेतला तर बंडखोर नेते TMC मध्ये परतणार, घरवापसीसाठी ठेवली मोठी अट
1

West Bengal Politics: आकडे फिरणार! ममता बॅनर्जींनी ‘हा’ निर्णय घेतला तर बंडखोर नेते TMC मध्ये परतणार, घरवापसीसाठी ठेवली मोठी अट

ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; तब्बल 12 बँक अकाउंट्स सील
2

ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; तब्बल 12 बँक अकाउंट्स सील

ममता बॅनर्जी यांना ‘ईडी’चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली
3

ममता बॅनर्जी यांना ‘ईडी’चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर
4

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.