नवी दिल्ली – पाटण्यात 200 हून अधिक लोकांना मुदत संपलेले रक्त देण्यात आले आहे. स्मॅकर्सकडून 700 रुपयांना रक्त खरेदी करून मागणीनुसार हे रक्त 5 ते 10 हजारांना विकले जात होते. रक्त कलेक्शननंतर, ते घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये भाजीपाला स्टोरेज स्पेसमध्ये साठवले जात होते. एवढेच नाही तर रक्त काढण्यापूर्वी आणि देण्यापूर्वी कोणतीही चाचणी केली जात नव्हती.
अशा परिस्थितीत रक्त दिल्यानंतर रुग्णांना याचा मोठा धोका असतो. पाटणा पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने छाप्यात रक्ताची 44 पाकिटे जप्त केली असून आता त्याची चौकशी केली जात आहे
पाटणा येथील कोतवाली परिसरात लॉकेट चोरीला गेले होते. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. शुक्रवारी रात्री पोलिसांना टीप मिळाली की, पत्रकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष नावाचा व्यक्ती टोळी चालवत आहे. या छाप्यात कोतवाली पोलिसांनी संतोषला अटक करून लॉकेट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अनेक लॉकेट आणि दागिने जप्त केले. छाप्यादरम्यान पोलिसांनी आरोपीचे फ्रीज उघडले असता त्याच्या पायाखासलची जमीनच सरकली. फ्रीजमध्ये रक्ताची 44 पाकिटे ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर औषध विभागाचे पथक तपासात गुंतले. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने संतोषसह अजयकुमार द्विवेदीला पकडले आहे.