उच्चायुक्तालयातील भेटीपासून पाकिस्तानातील गुप्तहेरीपर्यंत, ज्योती मल्होत्राने दिली गुन्ह्याची कबूली
Jyoti Malhotra News Update: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा कबुलीजबाब समोर आला आहे. ज्यामध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ज्योतीने भारत ते पाकिस्तान आणि पाकिस्तानातून परतण्याच्या तिच्या प्रवासातील सर्व काळे कारनामे तपास यंत्रणांसमोर उघड केली आहेत. “ज्योती पाकिस्तानच्या अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योतीने सीमेपलीकडे देशाशी संबंधित बरीच माहिती पाठवली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिल्यानंतर त्याची सुरुवात झाली.”
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती. ती सतत पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. ज्योतीने तिच्या जबाबात पोलिस आणि तपास यंत्रणांना आश्चर्यकारक माहिती दिली आहे. यासंदर्भात बोलताना ज्योती म्हणाली की, “माझ्याकडे ‘ट्रॅव्हल विथ-जो’ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. मी २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेलो होतो. तिथे माझी भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. दानिशचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर संभाषण सुरू झाले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला गेले.
“पाकिस्तानला गेल्यानंतर, दानिशच्या विनंतीवरून मी अली हसनला भेटले. अलीने माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. पाकिस्तानमध्ये, अली हसनने माझी पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट घडवून आणली आणि तिथे मी शाकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटले. मी शाकीरचा मोबाईल नंबरही घेतला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याचा नंबर ‘जाट रंधावा’ नावाने सेव्ह केला होता. शाकीर हा पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाचा अधिकारी आहे.”
पाकिस्तानातील मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांच्या संपर्कात होते. मी त्यांच्याद्वारे देशविरोधी माहिती पाठवली होती. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटल्याची कबुलीही तिने यावेळी दिली.