फोटो - सोशल मीडिया
आग्रा : ताजमहाल हा जगभरातील आठ आश्चर्यामधील एक आहे. भारताच्या सुंदर अशा स्थापत्यशैलीचा एक नमुना असलेला ताज महाल पाहण्यासाठी परदेशातून लोकं येत असतात. सध्या ताजमहाल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ताजपमहालच्या आतमध्ये एका व्यक्तीने गंगेचे पाणी ओतल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून असे वर्तन ही करणारी व्यक्ती हिंदू महासभेचा कार्यकर्ता देखील आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा हे मुमताज हिचे कबरस्थान आहे. नक्षीदार सुबक कामासाठी ताजमहाल प्रसिद्ध आहे. मात्र ताजमहालमधील कबरीवर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने गुपचुपपणे गंगाजल अर्पण केले. समाधीवर पवित्र गंगाजल अर्पण केल्याच्या आरोपावरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी विनेश आणि श्याम या दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत.
इन बेवकुफो को कोई समझाओ कीं सावन में गंगा जल शिवलिंग पर चढ़ाया जाता है ना कीं कब्र पर
आगरा :ताजमहल के अंदर कब्र पर अखिल भारत हिन्दू महासभा के कार्यकर्ताओं ने गंगाजल चढ़ाया।#tajmahal pic.twitter.com/6s0vDrc0CO
— Gaurav Yadav (@ygauravyadav) August 3, 2024
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक माणूस गुप्तपणे बिस्लेरीच्या बाटलीतून कबरीवर पाणी ओतत आहे. याठिकाणी एक सुरक्षा कर्मचारी देखील असल्याचे दिसत आहे. मात्र या सुरक्षारक्षकाने तरुणाला असे करण्यापासून रोखलेले नाही. तसेच त्या तरुणाला इतर कोणीही देखील पाणी टाकण्यापासून अडवले नाही.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय हिंदू महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड या देखील गंगाजलाचा कलश घेऊन आल्या होत्या. त्यांनी ताजमहलाजवळ जाऊन भगवान शिव तिच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तसे करण्याची आज्ञा दिली असल्याचा दावा केला. त्यांना ताजमहाल येथे गंगाजल अर्पण करायचे होते, मात्र पोलिसांनी त्यांना पश्चिमेकडील गेटवर अडवले. खूप तास सुरक्षा चौकात गोंधळ सुरू होता. ताज महाल हा तेजो महालय असून ते एक भगवान शिवाचे मंदिर आहे आणि त्या शिवलिंगावर गंगाजल अर्पण करण्यासाठी आल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.