झालावाड, राजस्थान : अंगावर शहारे उभे करील अशी घटना समोर आली आहे. 20 वर्षांची एक तरुणी बॉयफ्रेंडसोबत जंगलात फिरायला गेली असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला जबर मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार (Rape on Girl) करण्यात आला. बॉयफ्रेंडसोबत खासगी काही क्षण घालवण्यासाठी जंगलात गेली, एवढीच तिची चूक तिला प्रचंड महागात पडली आहे. या जंगलात फिरण्यासाठी अनेकदा त्या परिसरातील नागरिक आणि पर्यटक जात असतात. मात्र, पहिल्यांदाच हा निर्घृण प्रकार घडल्याचं समोर आलंय. या लज्जास्पद घटनेनंतर या तरुणीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमी युगुलावर गुडांची पडली नजर
कोठियाझीलच्या जंगलात असलेल्या आकाशवाणी केंद्राच्या जवळ अनेकदा नागरिक फिरण्यासाठी जातात. संध्याकाळी उशिराच्या सुमारास एक प्रेमी युगुल या ठिकाणी फिरायला गेलं होतं. संध्याकाळची वेळ असल्यानं या परिसरात कमी वर्दळ होती. मुलगा त्या मुलीचा हात हतात घेऊन तिच्याशी प्रेमसंवाद करीत होता. त्याचवेळी एक गुंड त्या ठिकाणी आला आणि त्यानं मुलाशी गैरवर्तणूक केली. या मुलाचा आणि मुलीचा एकत्र व्हिडीओही त्यानं शूट केला. व्हिडीओ डिलिट करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणीही करण्यात आली.
खासगी क्षण डिलिट करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी
मुलीनं या व्हिडीओसाठी 10 हाजर रुपये देण्यास नकार दिला. तर गुंड 10 हजारांच्या मागमीवर ठाम होता, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी तो देत होता. मुलगा घाबरलेला होता. त्यानं 10 हजार रुपये देण्याचं कबूल केलं आणि तो त्या मुलीला एकटीला सोडून पैसे आणण्यासाठी शहरात गेला. तो जेव्हा परतला त्यावेळी ती मुलगी आणि गुंड दोघंही बेपत्ता झालेले होते. नंतर तरुणीचा शोध लागला. जवळच असलेल्या कोटा रस्त्यावर ही तरुणी अर्धनग्न अवस्थेत सापडली. पोलिसांनी त्यानंतर तातडीनं कारवाी केली. या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणीनं दिलेल्या जबाबात गुंडाचं वर्णन करण्यात आलं होतं. त्यावरुन आरोपीला अटक करण्यात आली.
एकट्या तरुणीशी गुंडाचं क्रूर वर्तन
मुलगा पैसे घेण्यासाठी शहरात गेल्यानंतंर, एकट्या असलेल्या तरुणीशी गुंडानं असभ्यपणा करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं त्याला विरोध केला, त्यावेळी या गुंडानं तिला मारहाण केली. मुलीनं जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यानं तिचे कपडे फाडले. मुलगी जवळपास अर्धनग्न अवस्थेत होती. त्यानंतर त्यानं या तरुणीवर बलात्कार केला. अर्धवट बेशुद्धावस्थेत या तरुणीला रस्त्यावर टाकून आरोपी तिथून फरार झाला. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्यानं घेतलं असून, आरोपीला गजाआड करण्यात आलंय. अद्याप आरोपी आणि तरुणीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
आरोपी तुरुंगातून फरार
आरोपीला अटक करुन त्याला कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ठाण्यात 8 पोलीस कर्मचारी होते. मात्र हा आरोपी या सगळ्यांना गुंगारा देत पळून गेल्याचं आता समोर आलं आहे. आता पुन्हा पोलीस या आरोपीचा तपास करतायेत. या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.