मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात ATS ची नवसारीत मोठी कारवाई (photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, फैजान शेख हा मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील नरपत नगरचा रहिवासी आहे. तो गेल्या काही काळापासून नवसारीच्या चारपुल परिसरात आपली ओळख लपवून राहत होता. गुजरात एटीएस त्याच्या संशयास्पद हालचालींवर गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होती. अखेर ठोस पुरावे मिळाल्यानंतर एटीएसने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
Ahmedabad, Gujarat: DIG ATS Sunil Joshi says, “The Gujarat ATS constantly remains alert to prevent any attempt at terrorist activity in any part of the country. In this regard, the Gujarat ATS DSP Harsh Upadhyay received specific information that a person named Faizan, a native… pic.twitter.com/kX9pv6K9ZS — IANS (@ians_india) January 27, 2026
Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, फैजान शेख हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जैश आणि अल-कायदाच्या कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार करत होता. तो केवळ स्वतः कट्टरपंथी बनला नव्हता, तर ऑनलाइन माध्यमातून इतर तरुणांनाही हिंसाचारासाठी चिथावणी देण्याचे काम करत होता. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून अनेक आक्षेपार्ह मजकूर जप्त करण्यात आला आहे.
एटीएसच्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, फैजानने हत्येच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा मिळवला होता. त्याने ही शस्त्रे कोठून मिळवली आणि त्याचे स्थानिक पातळीवर कोणाशी संबंध आहेत, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या अटकेमुळे एक संभाव्य टार्गेट किलिंग किंवा मोठा हल्ला टळल्याचे बोलले जात आहे.
सुरक्षा यंत्रणा आता फैजानच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांचा शोध घेत आहेत. “वेळेत केलेल्या या कारवाईमुळे मोठा धोका टळला आहे, मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते, त्यामुळे तपास सुरू आहे,” असे एटीएस गुजरातच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.






