रोहतक: बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची पॅरोलवर तुरुंगातून सुटका होणार आहे. गुरमीत हरियाणातील रोहतक तुरुंगात बंद आहे. पंजाबमधील निवडणुकीच्या १३ दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटका होत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे ६९ जागांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या २१ दिवसांच्या रजा अर्जाला मंजुरी दिली आहे. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर त्याला तुरुंगाबाहेर आणले जाईल.






