(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आईने आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मेट्रो स्टेशनवर पकडले. तिने लगेच तिथेच त्यांचा साखरपुडा लावून दिला! हुशार आईने एकाच वेळी प्रकरण मिटवून टाकले; आता कोणतीही सबब राहणार नाही आणि लपूनछपून भेटण्याची गरजही भासणार नाही’. व्हिडिओमध्ये एक महिला मुलीला मिठाई आणि फळे देताना दिसून येते. ती दुसऱ्या व्यक्तीला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करून मुलीच्या आई-वडिलांना दाखवण्यास सांगते. पुढे ती मुलीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवते आणि तिला मिठाई भरवत आपली सून म्हणून तिचा स्वीकार करते. जेव्हा तिचा मुलगा तिला वारंवार थांबण्याची विनंती करतो तेव्हा आई म्हणते की, “आमचा जो अपमान झाला त्याच काय”. व्हिडिओच्या शेवटी आई दोन्ही मुलांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देताना दिसते.
🚨 माँ ने अपने बेटे को मेट्रो स्टेशन पर उसकी गर्लफ्रेंड के साथ पकड़ लिया।
तुरंत वहीं पर उसकी सगाई तय कर दी 😂 चतुर माँ ने एक ही झटके में मामला निपटा दिया, अब न बहाने रहेंगे, न छुपकर मिलने की जरूरत। pic.twitter.com/UBdDGnE14I — Annapurna (@imannupurna) February 7, 2026
हा व्हिडिओ @imannupurna नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही व्हिडिओ देखील पिज्जा बॉय सारखा स्क्रिप्टेड तर नाही, आजकाल कोणताही व्हिडिओ खरा आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ आई मास्टरमाईंड निघाली, तिने प्रेमप्रकरणाचे थेट लग्नात रूपांतर करून टाकले! ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पालकांनी योग्य निर्णय घेतला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






