सावतवाडीत मध्यवस्तीत आगीचे ताडव (फोटो- istockphoto)
सावंतवाडीत मध्यवस्तीत आगीचे तांडव
अग्निशमन व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ?
वन विभागासमोरील जुने गोदाम भक्ष्यस्थानी
सावंतवाडी: सावंतवाडी शहराच्या मध्यवस्तीत शनिवारी मध्यरात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. वनविभागाच्या कार्यालयासमोरील एका जुन्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. ‘द्वारकामाई’ बिल्डिंगच्या अगदी समोरच ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आगीच्या रौद्र रूपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे, घटनेची माहिती देऊनही सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब वेळेवर न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि. ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास या जुन्या गोदामातून धूर येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळा आकाशात उंच उडू लागल्या.
Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश
पालिकेचा बंब उशिरा पोहोचल्याने नागरिक संतप्त
गोदामात साठवलेल्या वस्तूंनी पेट घेतल्याने मोठ्या स्फोटांचे आवाजही परिसरात ऐकू येत होते. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत धरून घराबाहेर पडले. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी तत्काळ सावंतवाडी नगरपालिकेशी संपर्क साधला. मात्र, वारंवार फोन करून आणि आगीचे गांभीर्य लक्षात आणून देऊनही बराच वेळ पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला नव्हता.
मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO
भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने दाखवलेल्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास वनविभाग कार्यालयासमोर, द्वारकामाई बिल्डिंग परिसरात गोदामातील वस्तूंमुळे स्फोटांचे आवाज, नागरिकांमध्ये भीती व्यक्त होऊ लागली आगीच्या ज्वाळा भडकल्या परंतु अग्निशमन दलाचा बंब उशिरा पोहोचल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची भीती होती. अखेरीस अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेनंतर शहराच्या मध्यवस्तीतील अग्निशमन व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






