Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”; खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला

"मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेत्यांना विचारले पाहिजे की, त्यांनी पंजाबची राज्यसभेची जागा किती रुपयांना विकली होती?" अशा आक्रमक शब्दांत हरभजन सिंह यांनी स्वपक्षीयांवर आणि विरोधकांवर तोफ डागली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 08:45 PM
खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला (Photo Credit- X)

खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • “मला गद्दार म्हणणाऱ्यांना विचारा, राज्यसभेची जागा कितीला विकली?”
  • खासदारकीच्या राजीनाम्यावर हरभजन सिंग संतापला
  • जाणून घ्या काय म्हणाला…
Harbhajan Singh Controversy: क्रिकेटच्या मैदानातून राजकीय खेळपट्ट्यांवर उतरलेला भाजप खासदार आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आला आहे. “मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेत्यांना विचारले पाहिजे की, त्यांनी पंजाबची राज्यसभेची जागा किती रुपयांना विकली होती?” अशा आक्रमक शब्दांत हरभजन सिंह यांनी स्वपक्षीयांवर आणि विरोधकांवर तोफ डागली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एका युझरच्या कमेंटला उत्तर देताना हरभजन सिंग यांने हा खळबळजनक दावा केला. कोणाला किती रुपयांचा ‘चढावा’ गेला आणि तो कोणाकडून गेला, याचे सर्व खुलासे वेळ आल्यावर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हरभजन सिंह यांनी व्यक्त केला संताप

हरभजन सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे थेट नाव घेतले नाही. मात्र, एका राजकीय पक्षाने माझ्या घराबाहेर माझा पुतळा जाळला आणि त्यावर ‘गद्दार’ असे लिहिले, असा आरोप त्यांनी केला. “मी देशासाठी काय केले आहे हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यामुळे मला गद्दार म्हणणाऱ्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. या देशातील जनताच ठरवेल की मला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहे,” असे म्हणत त्यांने विरोधकांना सुनावले.

समय आने पर आपकी हर बात का जवाब दिया जाएगा । और मैं आपके किसी लीडर को गाली नहीं दी । अपनी जुबान क्यों गंदी करूँ मै । और मुझे ग़द्दार कहने वालो पहले अपने लोगो से पूछो पंजाब की राज्य सभा सीट कितने मे बेची थी । अगर ना बताए तो मैं आपको बताऊंगा किसको कितना चढ़ावा गया था और किसकी तरफ से… https://t.co/5sd2sxQDO7 — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 22, 2026

Political News : हरभजन सिंगचा BJPमध्ये प्रवेश अन् AAPचा मोठा दणका; पंजाब सरकारने हटवली Z+ सुरक्षा

राजीनामा न देण्याच्या प्रश्नावरून उडाला भडका

काही दिवसांपूर्वीच हरभजन सिंह यांनी आम आदमी पार्टी (AAP) सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. ‘आप’नेच त्याला पंजाबमधून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. याच मुद्द्यावरून ‘X’ वर देवेंद्र यादव नावाच्या एका युझरने त्याला थेट सवाल विचारला. त्या युझरने लिहिले, “ज्या नेत्याला तुम्ही दिवस-रात्र बरे-वाईट बोलत आहात, त्यांनी दिलेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेचा आधी राजीनामा का दिला नाही? पंजाबमधील ८०० हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या भाजपमध्ये जाण्याची तुमची अशी काय मजबुरी होती? तुमच्या इमानाची किंमत किती लावली गेली?” या धारदार प्रश्नावर हरभजन सिंगचा भडका उडाला.

दीदी political party ने ही मेरे घर के बाहर पुतला जलाया और गद्दार लिखा । common लोग तो ऐसे काम नहीं करते । किसने निर्देश दिए थे पार्टी people को यह सब काम करे । इस देश ने मुझे बहुत प्यार दिया है 20 sal देश का नाम ऊँचा किया खेल कि मैदान में । और आपके लोगो को लगता है वो कोई टैग लाए… https://t.co/ZlHIOXmwOl — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 22, 2026

“पंजाबला लुटण्यासाठी कोणाला कसे मंत्री बनवले, हे मी सांगेन!”

या थेट प्रश्नाला उत्तर देताना भाजप खासदार हरभजन सिंग म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले जाईल. मी तुमच्या कोणत्याही नेत्याला शिवीगाळ केलेली नाही, कारण मला माझी जीभ घाण करायची नाही. पण, मला गद्दार म्हणण्यापूर्वी तुमच्या नेत्यांना विचारा की पंजाबची राज्यसभेची जागा कितीला विकली होती?” तो पुढे म्हणाला, “जर तुमच्या लोकांनी हे सांगितले नाही, तर मग मी स्वतः जाहीर करेन की कोणाला किती आणि कसा चढावा गेला होता, कोणाकडून गेला होता. पंजाबला लुटण्यासाठी आणि ‘लाला’ला माल पोहोचवण्यासाठी कोणाला कसे मंत्री आणि संत्री बनवले गेले, हेही मी उघड करेन. या लोकांनी पंजाबला पूर्णपणे लुटून खाल्ले आहे.”

२० वर्षे देशाचे नाव उंचावले; जनतेच्या न्यायालयावर विश्वास

दुसऱ्या एका युझरला उत्तर देताना हरभजन सिंह यांनी स्पष्ट केले की, सामान्य जनता कधीही कोणाच्या घराबाहेर जाऊन पुतळे जाळत नाही. एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांनीच कार्यकर्त्यांना माझ्याविरुद्ध असे कृत्य करण्याचे आदेश दिले होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीची आठवण करून देत हरभजन सिंग म्हणाला, “या देशाने मला अफाट प्रेम दिले आहे. मी वाईट आणि संकुचित विचारसरणी दर्शवते. हा देश आणि येथील जनताच ठरवेल की त्यांना हरभजन सिंगला कसे लक्षात ठेवायचे आहे.” हरभजन सिंग यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पंजाब आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हरभजन सिंग यांच्या बंगल्याबाहेर आप कार्यकर्ते आक्रमक; भिंतीवर लिहिलं ‘गद्दार’

Web Title: Harbhajan singh slams critics over resignation asks price of rajya sabha seat punjab politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Harbhajan Singh
  • rajya sabha

संबंधित बातम्या

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
1

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Mohan Bhagwat: राम मंदिर देणगी चोरीच्या वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य; पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका!
2

Mohan Bhagwat: राम मंदिर देणगी चोरीच्या वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य; पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका!

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?
3

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद
4

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.