अहमदाबाद: काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल (Hardik Patel) कोणत्या पक्षामध्ये जाणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. हार्दिक पटेल यांनी याबाबत घोषणा केली आहे. येत्या २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल (Hardik Patel To Enter BJP) यांच्या या पक्षांतराचा भाजपला गुजरातमध्ये (Gujrat) फायदा होणार आहे. राज्यातील पाटीदार समाजाचं हार्दिक पटेल नेतृत्व करतात. या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. हार्दिक पटेल यांना भाजपमध्ये काय जबाबदारी मिळणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे.
[read_also content=”जम्मू – काश्मीरमध्ये शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या, बातमीने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/india/one-teacher-killed-by-terrorists-in-jammu-kashmir-nrsr-286832.html”]
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी राज्य नेतृत्वावर टीका करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. तसेच काँग्रेस नेत्यांकडून गुजराती लोकांचा अपमान होत असल्याचेही म्हटले होते.
हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात मनातील दु:ख व्यक्त करतानाच गुजराती अस्मितेचा मुद्दाही उपस्थित केला होता. काँग्रेस आता देश आणि समाजहिताच्या विपरीत काम करत आहे. काँग्रेसने फक्त विरोधाचं राजकारण करण्यापलिकडे काहीच केलं नाही. राम मंदिर, सीएए एनआरसी, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि जीएसटी लागू करणे आदी मुद्द्यांना काँग्रेसने विनाकारण विरोध केला आहे. जेव्हा देश संकटात सापडला, काँग्रेस नेते मात्र विदेशात होते, अशी टीका पटेल यांनी केली होती.