पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price Today) नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात. तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. मात्र, देशात तेलाच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये तेलाच्या किमती बदलतात.
[read_also content=”संतापजक! शेजारी नराधमाचा चिमुकलीवर बलात्कार, प्रकरण उघड होण्याच्या भीतीने हत्या करुन शव लपवलं बेडखाली https://www.navarashtra.com/crime/neighbors-killer-raped-a-little-girl-killed-her-and-hid-the-body-under-the-bed-fearing-the-case-would-be-revealed-nrps-390799.html”]
शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76 106.03
चेन्नई 94.24 102.63
देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना दिलेला RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. हा कोड पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शहराती किंमत किती आहे ते माहिती होईल.