भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्ट (LRF) मध्ये या वर्षी देशात सामान्य मान्सून असेल. हे सलग चौथं वर्ष असेल जेव्हा भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज (Rain Forecast) वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, IMD एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांत दीर्घ पल्ल्याचा अंदाज आहे.
[read_also content=”जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ४ दहशतवादी ठार, वाहन उलटल्याने दोन जवान शहीद https://www.navarashtra.com/india/encounter-in-jammu-and-kashmirs-shopian-4-terrorists-killed-two-soldiers-also-killed-due-to-vehicle-overturning-269020.html”]
“जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य आणि परिमाणात्मक असेल, तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९९ टक्के म्हणजे ८७ सेंटीमीटर असेल,” असं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले.
देशाचा मोसमी पाऊस हा सामान्य मानला जातो जेव्हा तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के असतो. यावर्षी, भारतीय हवामान विभागाने उन्हाळी मान्सूनचा हंगामी पाऊस आधीच्या ८८ सेमी (१९६१-२०२०वर आधारित) वरून ८७ सेमी (१९७१-२०२०वर आधारित) पर्यंत खाली येईल असं सांगितलं आहे.