फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी शुक्र राहूच्या नक्षत्रात म्हणजे शतभिषामध्ये प्रवेश करणार आहे. वेळोवेळ ग्रह राशी सोबतच नक्षत्र संक्रमण करत असतात. यावेळी 11 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रहाचे होणाऱ्या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या संक्रमणामुळे काही राशींना जीवनात चढ-उतार येऊ शकतात. या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. या काळात काही राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शुक्र ग्रहाच्या राहू्च्या नक्षत्रात संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो ते जाणून घ्या
शुक्राच्या नक्षत्रातील बदल काही क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी नकारात्मक ठरू शकतो. तुमच्या आर्थिक बाबतीत तुम्हाला चिंता वाढू शकतात आणि तुम्हाला अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. कामाच्या ठिकाणीही परिस्थिती फारशी अनुकूल नाही यावेळी तुम्हाला प्रत्येक काम विचारपूर्वक करावे लागेल. काहींना त्यांच्या कौटुंबिक जीवनात गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला समस्या येऊ शकतात. यावर उपाय म्हणून पांढरे कपडे दान करा आणि शुक्र ग्रहाशी संबंधित मंत्रांचा जप करा.
कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या शत्रूंपासून अत्यंत सावध राहावे. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी तुमच्या कामातील त्रुटी दाखवून देऊ शकतात आणि त्यांच्या वरिष्ठांशी त्यांची चर्चा करू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ताणली जाऊ शकते. या राशीच्या लोकांसाठी घरातील कामे वाढतील, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावर उपाय म्हणून, योगासने आणि ध्यान करा आणि संतोषी मातेची आरती करा.
शुक्र राशीतील बदलानंतर खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होऊ शकतो. पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट योग्यरित्या आखावे लागेल. मीन राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबद्दल देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्ही सहलीची योजना आखत असाल तर या काळात तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, कारण तुमची फसवणूक होऊ शकते. यावर उपाय म्हणून तुम्ही दूध, दही इत्यादी दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शुक्र ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्या बदलाला नक्षत्र परिवर्तन म्हणतात. याचा परिणाम सुख, वैभव, संबंध आणि आर्थिक बाबींवर होत असल्याचे मानले जाते.
Ans: राहू भ्रम, अस्थिरता आणि अचानक बदलांचे प्रतीक आहे. त्यामुळे खर्च वाढणे, चुकीचे निर्णय, मानसिक ताण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे ज्योतिष मानते.
Ans: राहूच्या नक्षत्रात शुक्राने प्रवेश केल्याने कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना समस्या जाणवू शकतात.






