नवी दिल्ली : २३ ऑगस्टला भारताने ऐतिहासिका कामगिरी केली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-३) च्या यशाने संपूर्ण देश आनंदात आहे. भारताने २३ ऑगस्ट रोजी इतिहास घडवला आहे. चांद्रयान-३ (Chandrayaan 3) नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर आणि दक्षिण धुव्रार भारत जगात पहिल्यांदा पोहचल्यानंतर आता ISRO नं एका आठवड्यानंतर संपूर्ण जगाला एक मोठी आनंदाची बातमी तसेच नवीन माहिती दिली आहे. काल रोव्हरच्या वाटेत खड्डा आढळला होता. मात्र आता चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने नवीन माहिती शोधली आहे. अशी ISRO कडून नवी माहिती देण्यात आली आहे. यानंतर इस्रो (ISRO) कडून क्रांतीकारी व नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळं या संशोधनातून भारत ऐतिहासिक वाटचाल करत आहे. (In front of Istro’s new and revolutionary information, Vikram lander captures the movements of the Moon’s hemispheres; Will the mystery of ‘this’ on the moon be revealed)
चंद्रावरील ‘हे’ रहस्य उलगडणार?
दरम्यान, विक्रम लँडरकडून सातत्याने नवीन संशोधन केलं जात आहे. चंद्राच्या गोलार्धावर विक्रम लँडर सातत्याने नवनवे प्रयोग करत आहे. आता तर विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या आहेत, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. यामुळं चंद्रावरील अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. तसेच चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. लँडरच्या उपकरणांनी गुरुवारी चंद्रावरील पृष्ठभागावर सिस्मिक अॅक्टिव्हिटीचा शोध घेतला आहे, तसेच प्रज्ञान रोव्हर आणि दुसऱ्या पेलोड्समधील हालचाली रेकॉर्ड करण्यात यशस्वी ठरली आहेत, असं असं इस्रोने म्हटलं आहे.
लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या आहेत. तसेच चंद्रावरही भूकंप होत असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे आता चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार आहे. या संशोधनातून क्रांतिकारी माहिती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. विक्रम लँडरमध्ये काही महत्त्वाची उपकरणे लावण्यात आली आहेत. यावरून चंद्राच्या गोलार्धावर होणारी कंपने रेकॉर्ड केली जात आहेत. अशा प्रकारची कंपने रेकॉर्ड करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत.