पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट (फोटो- ani)
नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा
नेपाळमध्ये सत्तापालट होणार
आंदोलकांनी संसदभवनाला लावली आग
भारतातील सुरक्षा यंत्रणा सावध
Nepal Crisis: कालपासून नेपाळमध्ये हिंसाचार घडत आहे. काल नेपाळ सरकारने सोशल मिडियावर बंदी घातली होती. त्यानंतर तेथील नागरिकांनी मोठे आंदोलन केले. मात्र सरकारने सोशल मिडियावर घातलेली बंदी मागे घेतल्ली आहे. मात्र त्यानंतर तेथील हिंसाचार वाढला आहे. दरम्यान पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड केली आणि आग लावली. यापूर्वी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला होता. निदर्शकांनी सुरक्षा दलांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
भारताच्या सीमेवर सावधगिरी
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील सावध भूमिका घेतली जात आहे. नेपाळच्या सीमेवर असणाऱ्या राज्यांच्या सीमेवर सुरक्षा वाढवली गेली आहे. भारतातील पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नेपाळमध्ये हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नेपाळ भारत सीमेवर सुरक्षा वाढवली गेली आहे. सुरक्षा दलाने सीमावर्ती भागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पश्चिम बंगालची सीमा नेपाळला लागून आहे. नेपाळ सध्या अशांत आहे. त्यामुळे नेपाळमधून काही नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.
नेपाळमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही नेपाळचे सामान्य नागरिक सीमावर्ती भागातून भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा तसेच खास करून पश्चिम बंगालमध्ये चोख बंदोबस्त ठेवला गेला आहे. भारत सरकारने देखील सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे.