अखेर पाकिस्तानने मान्य केलंच...; 11 सैनिकांसह ७८ जवान शहीद
इस्लामाबाद : भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहचला होता. पण १० मे ला युद्धविरामाची घोषणा कऱण्यात आली आणि तणाव काही प्रमाणात निवळला. या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याकडून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पण पाकिस्तानकडून या नुकसानीबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. पण या संघर्षादरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानीचा तपशील समोर आला आहे.
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे.
धोका अजून टळलेला नाही! एअर इंडिया आणि इंडिगोची ‘या’ मार्गावरील उड्डाणे अजूनही रद्द
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR)च्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले गेले. त्यानंतर झालेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे ४० सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आजच (१३ मे) पाकिस्तानी लष्कर आणि भारतीय सैन्कांमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात लष्करी आणि नागरिकांच्या हानीची अधिकृत माहिती जाहीर केली. ६ आणि ७ मे रोजी भारतीय कारवाईला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन बुनयान-अन-मार्सास’ दरम्यान देशाचे रक्षण करताना ११ सैनिक शहीद झाले आणि ७८ जवान जखमी झाले.
आयएसपीआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय हल्ल्यात नाईक अब्दुल रहमान, नाईक वकार खालिद, लान्स नाईक दिलावर खान, इक्रामुल्ला, शिपाई आदिल अकबर आणि शिपाई निसार हे सहा लष्करी जवान शहीद झाले आहेत. भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवाई हल्ल्यात हवाई दलाचे पाच अधिकारी शहीद झाले आहेत. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, चीफ टेक्निशियन औरंगजेब, सिनियर टेक्निशियन नजीब, सिनियर टेक्निशियन मुबाशिर आणि कॉर्पोरल टेक्निशियन फारूक यांचा समावेश आहे.
Monsoon News: खुशखबर! मान्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला पाऊस येणार
पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात लष्करी जीवितहानी व्यतिरिक्त अनेक नागरिकही जखमी झाले. आयएसपीआरच्या निवेदनानुसार, सात महिला आणि १५ मुलांसह ४० नागरिक ठार झाले, तर २७ मुले आणि १० महिलांसह १२१ जण जखमी झाले. भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा आणखी एक पुरावा समोर आला आहे, जिथे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर रावळपिंडीतील एका रुग्णालयात भेट देत आहेत आणि जखमी लष्करी जवानांना भेटत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
याशिवाय, भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत अनेक पाकिस्तानी सैन्य सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रावळपिंडीतील रुग्णालयात जखमी सैनिकांना भेट दिली. यापूर्वी, पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य भारतीय हवाई हल्ल्यात त्यांचे नुकसान आणि सैनिकांच्या मृत्युचे दावे सतत नाकारत होते. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानचे खोटे दावे उघड झाले आहेत.