हरियाणात हवाई दलाचं ‘जग्वार’ कोसळलं, अंबाला एअरबेसवरून केलं होतं उड्डाण
भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान आज हरियाणातील पंचकुला येथे कोसळलं. हवाई दलाच्या या विमानाने अंबाला एअरबेसवरून उड्डाण भरलं होतं. पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडला आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाच्या सिस्टममध्ये बिघाड झाल्याचं समजताच पायलटने प्रथम विमान रहिवाशी भागापासन दूर नेलं. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, अशी माहिती आयएएफने दिली आहे.
A fighter jet fell near Baldwala village in Morni, a hilly area of Panchkula..According to the information, the pilot of the fighter jet landed safely using a parachute. The local police team reached the spot. #jaguar #Aircraft #crash #panchkula #haryana #HaryanaAssemblyBudget pic.twitter.com/zy1TTqXg0r
— Kavita Raj Sanghaik (@KAVITARAJ5) March 7, 2025
अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. वैमानिकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली. विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी उड्डाण केलं होतं. गेल्या महिन्यातच, मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळ नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान मिराज २००० लढाऊ विमान कोसळलं होतं. अपघातापूर्वी दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले होते.
नोव्हेंबर २०२४ मध्ये, उत्तर प्रदेशातील आग्राजवळील एक मिग-२९ लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान शेतात कोसळलं होतं. अपघातादरम्यान वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडला. या विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण केलं होतं आणि सरावासाठी आग्रा येथे जात असताना हा अपघात झाला.