उद्योग विश्वातुन एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबई जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी सज्जन जिंदाल ( Sajjan Jindal ) यांच्यावर मुंबईतील एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. जिंदाल यांनी एक निवेदन जारी करून आरोप फेटाळले असून ते खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सूरत डायमंड बोर्सचं केलं उद्घाटन; देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचा व्यक्त केला मानस! https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-mondi-inaugurates-surat-diamond-borsch-nrps-489592.html”]
मुंबईतील एका 30 वर्षीय महिलेने उद्योगपती सज्जन जिंदालवर लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेने असा दावा केला की ती काही वर्षांपूर्वी दुबई येथे एका क्रिकेट सामन्यात जिंदाल यांना भेटली होती, त्यानंतर त्यांची मैत्री झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, नंतर उद्योगपती तिच्याकडे आकर्षित झाला. 24 जानेवारी 2022 रोजी सज्जन जिंदालने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच त्यांनी लग्नाचे वचन दिले मात्र, ते पूर्ण केले नाही. जिंदालने आपली माफी मागितल्याचा दावा महिलेने केला आहे. यामुळे याप्रकरणी तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्याने महिलेला त्याच्याशी संपर्क करण्यापासून रोखले होते. असही महिलेनं म्हण्टलं आहे.
महिलेच्या आरोपावर आता सज्जन जिंदाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महिलेनं त्यांच्यावर आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यांनी अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, “हे खोटे आणि बिनबुडाचे आहेत आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू”.
या प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही महिला फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी गेली होती, मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर ती मुंबई उच्च न्यायालयात गेली. 13 डिसेंबर रोजी मुंबईतील बीकेसी पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये सज्जन जिंदालविरुद्ध आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (महिलेच्या विनयभंग) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) लावण्यात आले आहेत.