Isha Foundation Founder Jaggi Vasudev Undergoes Emergency Brain Surgery, Watch Post-Surgery VIDEO

Jaggi Vasudev Brain Surgery : ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

    Jaggi Vasudev Brain Surgery : जगप्रसिद्ध ईशा फाउंडेशनचे संस्थापक असलेले आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मागील चार आठवड्यांपासून डोकेदुखीने त्रस्त होते असे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांच्या मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

    दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात करण्यात आली सर्जरी

    जग्गी वासुदेव यांची तब्येत बिघडल्यानंतर १७ मार्च रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदुवरील शूज खूपच वाढल्याचे पाहायला मिळले होते. त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ मार्च रोजी इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली. सध्या जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.