Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Jantar-Mantar : जंतर-मंतरला निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून हटवण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 08:07 PM
Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला आव्हान
  • आंदोलनस्थळांवर मूलभूत सुविधांची गरज
  • शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार असल्याचे मत
 

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरला (Jantar-Mantar) निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून हटवण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. वकील लक्ष्य सैनी आणि तुषार गुप्ता यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी (15 ऑक्टोबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जंतर-मंतर हे दिल्लीतील आंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. नागरिकांना आंदोलनासाठी शहरापासून दूर असलेल्या पर्यायी ठिकाणी पाठवल्यास त्यांना आपला आवाज उठवणे आणि निषेध नोंदवणे कठीण होऊ शकते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार केवळ कागदावरच मर्यादित राहण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

आंदोलनासाठी तीन पर्यायी ठिकाणे

दिल्ली पोलिसांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात जंतर-मंतरला निर्धारित आंदोलनस्थळाच्या यादीतून वगळल्याची माहिती दिली होती. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार शांततापूर्ण आंदोलनांसाठी तीन पर्यायी ठिकाणांची ओळख पटवण्यात आल्याचे सांगितले होते.

दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही तीन ठिकाणे आंदोलनांसाठी प्रस्तावित केली आहेत. या ठिकाणांची निवड सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Central Govt Cabinet Decision : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ४ सरकारी योजनांची नावं बदलली, इंदिरा गांधींचं नाव योजनेतून हटवलं!

युवक काँग्रेसच्या याचिकेवरून प्रकरण चर्चेत

भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान जंतर-मंतरला निर्धारित आंदोलनस्थळाच्या यादीतून वगळण्याचा मुद्दा समोर आला.

दिल्ली पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी जंतर-मंतरला आंदोलनस्थळाचा दर्जा नसल्यामुळे उदय भानू चिब यांची याचिका निष्फळ ठरल्याचा युक्तिवाद केला. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा यांनी याचिकेतील इतर मागण्यांवरही विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अमित महाजन यांनी याचिकेतील तीन मागण्यांवर नोटीस जारी केली.

Justice K Chandru on Collegium System: न्यायमूर्तींच्या नियुक्तीत ‘भगवेकरण’!; माजी न्यायमूर्ती के. चंद्रूंचा धक्कादायक गौप्यस्फोट

आंदोलनस्थळांवर मूलभूत सुविधांची गरज

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सक्षम अधिकाऱ्यांना राजधानीत शांततापूर्ण आणि कायदेशीर आंदोलनांसाठी योग्य पर्यायी ठिकाणे निश्चित करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते. या ठिकाणी मूलभूत सुविधा आणि आवश्यक पायाभूत व्यवस्था उपलब्ध करून देण्यावरही न्यायालयाने भर दिला होता.

आता जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानावर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जंतर-मंतरबाबत कोणता निर्णय घेण्यात आला आहे?

    Ans: दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळले आहे.

  • Que: या निर्णयाला कोणी आव्हान दिले आहे?

    Ans: वकील लक्ष्य सैनी आणि तुषार गुप्ता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • Que: आंदोलनासाठी कोणती पर्यायी ठिकाणे प्रस्तावित आहेत?

    Ans: रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही तीन ठिकाणे प्रस्तावित आहेत.

Web Title: Jantar mantar protest site supreme court petition rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Congress
  • Jantar Mantar
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
1

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
2

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
3

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन
4

भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.