देशाच्या पुढचे सरन्यायाधीश (Next CJI Of India) म्हणून कोण काम करणार हे आता स्पष्ट झाले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N V Ramana) यांनी आज देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे.
[read_also content=”भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक https://www.navarashtra.com/sports/indian-womens-hockey-team-reached-the-semi-finals-311817.html”]
सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली. केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून ३ ऑगस्टला सरन्यायाधीशांच्या सचिवालयाला सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याविषयी पत्रव्यवहार झाला होता. त्यानंतर सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांचे नाव सुचविले.
ए. व्ही. रमणा २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.