नवी दिल्ली: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Justice Uday Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. येत्या २७ ऑगस्ट रोजी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून ते काम पाहणार आहेत. कायदा मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.
[read_also content=”आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी सोमय्या पिता – पुत्रांना अटकेपासून दिलासा https://www.navarashtra.com/maharashtra/relief-to-kirit-somaiya-and-his-son-in-ins-vikrant-case-nrsr-314536.html”]
सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस एन व्ही रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांची जागा न्या. उदय लळीत घेणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १२४ अंतर्गत उपकलम २ नुसार राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. देशाचे सरन्यायाधीश म्हणून २७ ऑगस्टपासून ते कार्यरत असतील असं कायदा मंत्रालयाच्या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.
न्यायमूर्ती उदय लळीत हे मुळचे देवगड तालुक्यातील आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकीली पेशामध्ये अनेक जण आहेत. त्यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे.