ही आहे वायुदलाची आन,बान आणि शान अन् भारतीयांचा अभिमान
बंगळुरू – येथील एअरफोर्स टेक्निकल कॉलेज (AFTC) मध्ये शनिवारी एका प्रशिक्षणार्थी कॅडेटने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. दरम्यान, या आत्महत्या करणाऱ्या २७ वर्षीय कॅडेटची कॉलेजच्या माध्यमातून चौकशी सुरू होती. अंकित कुमार झा असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी कॅडेटचे नाव असून तो मुळ दिल्ली येथील होता.
आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी कॅडेटच्या खोलीतून सात पानी सुसाईड नोट मिळाली असून पोलिसांनी जप्त केली. यात एअर कमांडर, विंग कमांडर आणि ग्रुप कॅप्टन यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. सर्व अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान एका महिलेशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून त्याची कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून तो खूप अस्वस्थ झालेला होता, अशी माहिती समोर आली.
अंकित यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. कुटुंबातील लोक म्हणाले की, कॉलेजमध्ये अंकितचा सातत्याने छळ केला जात होता. अंकितचा भाऊ अमन याने एफआयआर दाखल केला आहे. पुराव्यांशी छळ केला असल्याचे आरोपही अमनने आपल्या तक्रारीत केले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, अंकितच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.