फोटो सौजन्य - बीसीसीआय/आयसीसी सोशल मिडिया
India vs South Africa Toss Update : कर्णधारपद हे शुभमन गिल याकडे असणार आहे तर दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद हे टेम्बा बवुमा याकडे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे चॅम्पियन आहेत त्यामुळे भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या सामन्यांचे नाणेफेक पार पडले आहेत, सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bowl first in Kolkata. Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/St1ygiQWwt — BCCI (@BCCI) November 14, 2025
भारताचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार रिषभ पंत चार महिन्यानंतर भारतीय संघामध्ये परतला आहे. भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये चौथ्या कसोटी सामन्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बराच वेळ क्रिकेटपासून दुर राहावे लागले होते. साई सुदर्शनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय सर्वांच्याच समजण्यापलीकडे आहे. शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांनी आता वॉशिंग्टन सुंदरची जागा तिसऱ्या क्रमांकावर घेतली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. शुभमन गिलने वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या चारही फिरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. साई सुदर्शन बाहेर आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल हा प्रश्न आहे. ऋषभ पंत अंतिम संघात परतला आहे, तर ध्रुव जुरेल देखील संघात आहे.
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वाॅशिग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, मार्को जानसेन, केशव महाराज






