केरळमध्ये महापूर (फोटो- सोशल मीडिया)
तिरूवअनंतपुरम: मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मान्सून दाखल होण्याचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महापुराने केरळमध्ये थैमान घातले आहे. महापुराचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. केरळमध्ये सध्या पुरामुळे काय स्थिती आहे हे, जाणून घेऊयात.
केरल में बारिश और तूफान ने मचाई तबाही
पोनमुडी, कल्लरकुट्टी, लोअर पेरियार और मलंकारा बांधों के शटर खुले
पेरियार, कल्लर, मुथिरापुझायार और थोडुपुझा-मुवत्तुपुझा जैसी नदियों ऊफान
नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने की सलाह#Monsoon2025 #Kerala pic.twitter.com/R1cA7olauk
— अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) June 26, 2025
केरळमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभगाने केरळसाथी रेड अलर्ट जारी केला आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे तिरूवअनंतपुरममध्ये काही नुकसान झाले आहे. सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मलपुरम आणि वायनाड जिल्ह्यात रेड अलर्ट तर अन्य 7 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्य सरकारने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही नद्या या इशारा पातळीवरून वाहत आहेत. पावसाचा जोर असाच वाढल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्तर राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
Monsoon Alert: ‘या’ पर्यटनस्थळी ढगफुटी
महाराष्ट्र आणि देशातील अनेक राज्य मान्सूनने व्यापली आहेत. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशमधून एक बातमी समोर येत आहे. कुल्लू-मनाली ही हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. कुल्लू यथे ढगफुटी झाली आहे. ढगफुटी झाल्यानंतरचा तेथील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओ पाहून किती जोरदार पाऊस झाला असेल याचा अंदाज येत आहे.
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.
Monsoon Alert: ‘या’ पर्यटनस्थळी ढगफुटी! पुढच्या 24 तासांत…; समोर आला भयावह VIDEO
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गुजरात राज्यात देखील प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील 26 जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर तीन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पानी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.