पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून मजुराची हत्या; 24 तासांतील दुसरा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे उत्तर प्रदेशातील एका स्थलांतरित कामगाराची दहशतवाद्यांनी (Worker Killed) गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे उत्तर प्रदेशातील एका स्थलांतरित कामगाराची दहशतवाद्यांनी (Worker Killed) गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. ‘दहशतवाद्यांनी पुलवामाच्या नोपोरा भागात उत्तर प्रदेशच्या मुकेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मजुरावर गोळीबार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे’, असे पोलिसांनी ट्विटरवर सांगितले.

    पुलवामा येथे गेल्या 24 तासांतील हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. रविवारी ईदगाह परिसरात क्रिकेट खेळत असताना निरीक्षक मसरूर अहमद वानी यांच्यावर तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. श्रीनगरमधील सर्व प्रमुख चौकांवर तसेच शहराच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी मोबाईल वाहन तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.

    घुसखोरीचा प्रयत्न उधळला; एक दहशतवादी ठार

    कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यदलाने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरन सेक्रमधील जमागुंड भागात ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सोमवारी सकाळी जेव्हा शोध घेण्यात आला. तेव्हा दहशतवाद्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.