पश्चिम बंगाल : लोकसभा मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. सातव्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल 8 राज्यांमध्ये मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होत आहे. दरम्यान, दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यामध्ये मतदान चालू असताना मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन पाण्यामध्ये फेकून दिल्याची घटना घडली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेतेने दिलेल्या बातमीनुसार, पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यातील कुलताली येथे सदर प्रकार घडला आहे. काही जणांनी बुथ क्रमांक 40 व 41 येथील मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला. आरोपींनी घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली. यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. आरोपींनी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपीएटी मशीन उचलून घेतले आणि जवळ असणाऱ्या तलाव्यामध्ये फेकून दिले. यामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता.
पीटीआय वृत्तसंस्थेचे ट्वीट
VIDEO | Lok Sabha Elections 2024: EVM and VVPAT machine were reportedly thrown in water by a mob at booth number 40, 41 in Kultai, South 24 Parganas, #WestBengal.
(Source: Third Party)#LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/saFiNcG3e4
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2024
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे. काही पोलिंग एजेंटला मतदान केंद्रामध्ये थांबण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. या प्रकरणी सेक्टर ऑफिसरकडून एफ.आय.आर दाखल करण्यात आली आहे. या सेक्टरमधील सहा बुथवर अखंडित मतदान सुरु आहे. या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.