महाकुंभ मेळ्यावरून परततणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस ट्रकला धडकली; ७ जणांचा जागीच मृत्यू
महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ भीषण अपघात झाला. भाविकांची बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर झाली आहे. जखमींना तात्काळी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरुवात केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून परतत होती. दरम्यान आज मंगळवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३० वर मोहला आणि बर्गी गावादरम्यान बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. सिमेंटनं भरलेला ट्रक चुकीच्या दिशेनं येत होती. हा बसचा भीषण अपघात घडला. प्रवासी बस एक ट्रकला धडकली. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, बसच्या काही भागाचे तुकडे झाले आहेत. स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून परतत होती. मोहला आणि बर्गी गावादरम्यान बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. सिमेंटनं भरलेला ट्रक चुकीच्या दिशेनं येत होती. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं बोललं जातंय. बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसमधील प्रवासी हे आंध्र प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
गंगाखेड आगाराची बस अहमदपूर येथून गंगाखेडला येत होती. दरम्यान, पिंपळदरी येथील निळा नाईक तांडा उताराच्या रस्त्यावर बसच्या समोर अचानक शेळ्या आल्या. शेळ्यांना वाचवण्याच्या नादात धावत्या बस चालकाने अचानक जोरात ब्रेक लावले. त्यामुळे बस सात फूट खोल दरीत कोसळल्याने 20 प्रवाशी जखमी झाले. जखमींपैकी चार जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 10 फेब्रुवारी सोमवारी अकराच्या सुमारास घडली.
गंगाखेड आगराची बस सकाळी 8 वाजता अहमदपूर (जि.लातूर) येथे फेरी मारते. सकाळी गंगाखेड बसस्थानकातील तसेच या मार्गावर थांबा असलेल्या गावातील प्रवाशी घेऊन सुखरूप अहमदपूरला पोहचली. अहमदपूर येथून बस (क्र. एमएच २० डिएल १७९२) ही बस परत गंगाखेडला 30 प्रवाशी घेऊन निघाली होती. पिंपळदरीपर्यंत आली असता निळा नाईक तांडा उतारावर शेळ्या एकदम बससमोर आल्या. या शेळ्यांना वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सात फूट दरीत कोसळली. त्यामुळे बसमध्ये 30 प्रवाशी होते. त्यातील 20 प्रवाशी जखमी झाले.