छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना (फोटो- सोशल मिडिया)
मुंगेली: छत्तीसगडच्या मुंगेली या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. एका प्रकल्पाची चिमणी पडल्याने त्याच्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. दरम्यान ही दुगहटण घडतंच तातडीने त्या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत.
Chhattisgarh: Labourers feared trapped at an iron-making factory in Sargaon, Mungeli after the silo structure of the factory collapsed. One injured labourer has been admitted to a hospital. Police and Administration are present at the spot. Rescue operation is underway: Mungeli…
— ANI (@ANI) January 9, 2025
दरम्यान आतापर्यंत या घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि रेस्क्यू टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही दुर्घटना सरगाव येथील रामबोड या भागात घडली आहे. प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य करत आहे. ही दुर्घटना लोखंडी पाईप बनवण्याच्या कारखान्याचे बांधकाम सुरू असताना घडली आहे.
कारखान्याची चिमणी कोसळल्याने 25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे.
तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी; भाविकांचा मृत्यू
जगप्रसिद्ध अशा तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. वैकुंठ द्वारावर दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपती बालाजी मंदिरात झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जखमी भाविकांवर सुरू असलेल्या उपचारबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तिथे घडलेल्या घटनेबद्दल माहिती देखील चंद्राबाबू नायडू यांनी घेतली.
हेही वाचा: Tirupati Balaji Stampede: तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी; भाविकांचा मृत्यू, पहा Video
नेमके घडले काय?
आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात वैकुंठ द्वाराजवळ दर्शनासाठी पास घेण्यास प्रचंड गर्दी जमली होती. त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक आजारी पडले. अनेक भाविक बेशुद्ध झाले. तर अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 10 ते 19 जानेवारी दरम्यान तिरूपती बालाजी मंदिरात वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. यासाठी लाखों भाविक येण्याची शक्यता आहे.
तिरुपती मंदिराची देखभाल करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, टीटीडीच्या अध्यक्षांनी चेंगराचेंगरीमागील खरे कारण स्पष्ट केले आहे. खरंतर, काल म्हणजेच 8 जानेवारी 2025, बुधवारी वैकुंठ एकादशीचा उत्सव साजरा होत होता, त्यामुळे तिरुपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. संध्याकाळपासून लोक लांब रांगेत उभे होते. अशा परिस्थितीत, दर्शन टोकन वाटण्यासाठी विशेष काउंटर बनवण्यात आले.