तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी (फोटो- टीम नवराष्ट्र )
तिरूपती: जगप्रसिद्ध अशा तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. वैकुंठ द्वारावर दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Andhra Pradesh: A stampede-like situation occurred at Vishnu Nivasam in Tirupati during the distribution of Vaikunta Dwara Sarva Darshan tokens. More details awaited. pic.twitter.com/vhoEYGLW2U
— ANI (@ANI) January 8, 2025
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपती बालाजी मंदिरात झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जखमी भाविकांवर सुरू असलेल्या उपचारबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तिथे घडलेल्या घटनेबद्दल माहिती देखील चंद्राबाबू नायडू यांनी घेतली.
नेमके घडले काय?
आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात वैकुंठ द्वाराजवळ दर्शनासाठी पास घेण्यास प्रचंड गर्दी जमली होती. त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक आजारी पडले. अनेक भाविक बेशुद्ध झाले. तर अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 10 ते 19 जानेवारी दरम्यान तिरूपती बालाजी मंदिरात वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. यासाठी लाखों भाविक येण्याची शक्यता आहे.