Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट
विरोधकांच्या गदारोळातच संसदेचे कामकाज ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडला आहे. तत्पूर्वी, विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला आणि पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेससह विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये उतरले.
अध्यक्षा संध्या राय यांनी आंदोलक सदस्यांना त्यांच्या जागी परतण्याचे आणि कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या गोंधळातच सत्र ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर मंत्री पुरी यांनी आपण एपस्टीनला काही वेळा भेटले होतो, परंतु त्यांच्या संभाषणांचा त्याच्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही, असे मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले होते.
विरोधकांची संसदेच्या आवारात तीव्र निदर्शने
एपस्टाईन फाइल्सवरून मंत्री पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. काँग्रेस आणि इतर विरोधी खासदार संसद भवनाच्या मकर गेटजवळ जमले आणि हरदीप पुरी, राजीनामा द्या! अशा घोषणा देत निषेध करत होते. एपस्टीन आणि पुरी यांचे फोटो असलेले मोटे बॅनरही आदोलकांच्या हातात होते.
हरीदप पुरी यांचे एपस्टीनशी संबंध उघड झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी जेफ्री एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश असल्याचे म्हटले होते. खासदार राऊत म्हणाले की, “आपण एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार या सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का?”
Jeffrey Epstein: एपस्टीनशी मोदींचे काय नाते? सरकारने खुलासा करावा; पृथ्वीराज चव्हाण यांची ठाम मागणी
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
Ans: हरदीप पुरी यांच्या अमेरिकी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी झालेल्या बैठका व संभाषणांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: हरदीपसिंग पुरी यांनी एपस्टीनची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. परतु त्याच्या गुन्हेगारी कृत्यांशी कोणताही संबंध असल्याच्या आरोपांना पुरी यांनी नाकारले आहे.






