मेट्रोने प्रवाश करताय, मग, आधी जाणून घ्या तिकीटसंदर्भातील महत्त्वाची अपडेट (फोटो सौजन्य-ट्विटर)
रेल्वे तिकिटांप्रमाणेच आता तुम्ही घरबसल्या मेट्रोचे तिकीट बुक करू शकणार आहात. आता फक्त ट्रेनच नाही तर मेट्रोचे तिकीट देखील IRCTC च्या ॲप आणि वेबसाइटवरून बुक करता येणार आहे. म्हणजेच IRCTC आता मेट्रो तसेच रेल्वेचे आगाऊ बुकिंग करू शकणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) यांनी ‘एक भारत, एक तिकीट’ ला प्रोत्साहन देण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
IRCTC वेबसाइटवरून रेल्वे आरक्षणासाठी 4 महिन्यांसाठी म्हणजे 120 दिवसांसाठी आगाऊ तिकीट बुकिंगची सुविधा मिळते. त्याचप्रमाणे, आता तुम्ही मेट्रोने प्रवास करण्यासाठी 120 दिवस अगोदर आगाऊ बुकिंग करू शकता. एकदा घेतलेले तिकीट 4 दिवसांसाठी वैध राहील. तर सध्या मेट्रोच्या तिकीटाची वैधता केवळ एक दिवसाची आहे. मेट्रोचे तिकीट प्रवासाच्या नियोजित तारखेच्या 2 दिवस आधी आणि दोन दिवसांनी वैध असेल. याचा अर्थ तुम्ही लवकर किंवा उशिरा पोहोचलात तरीही तुमचे पैसे बुडणार नाहीत आणि त्याच मेट्रोच्या तिकीटाने तुम्ही प्रवास करू शकाल. काही कारणास्तव रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागले तर त्यासोबत मेट्रोचे तिकीटही रद्द केले जाऊ शकते.
मेट्रो तिकिटांचे बुकिंग IRCTC वेबसाइट आणि ॲपद्वारे केले जाऊ शकते. एकदा घेतलेले तिकीट 4 दिवसांसाठी वैध राहील. तर सध्या मेट्रोच्या तिकीटाची वैधता केवळ एक दिवसाची आहे. IRCTC कडून मेट्रो रेल्वेसाठी तिकीट बुक करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या बुकिंग सिस्टममध्ये बदल केले आहेत. मेट्रोची तिकिटे QR कोडने बुक केली जातील, त्यांचा QR कोड रेल्वेच्या तिकिटावर छापला जाईल. लोकांना हवे असल्यास ते त्याची प्रिंटआउट घेऊन ते त्यांच्याकडे ठेवू शकतात किंवा त्यांच्या फोनवर स्क्रीन शॉट घेऊन ते वापरू शकतात.
मेट्रो तिकीट बुकिंगसाठी IRCTC च्या मोबाईल ॲपची बीटा आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. सध्या ते फक्त अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या फोनवरच चालेल. 4 महिन्यांच्या चाचणीनंतर, ते आवश्यक बदलांसह पूर्ण आवृत्तीमध्ये लॉन्च केले जाईल. मेट्रो तिकिटांच्या आगाऊ बुकिंगमुळे, मेट्रो स्थानकांवर तिकीट खिडक्याबाहेरील लांबलचक रांगा कमी होतील.