‘मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारले’; ‘या’ महिला खासदाराचा गंभीर आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर भाजपच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील ही शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी सडकून टीका केली.

    पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर भाजपच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील ही शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी (MP Rama Devi) सडकून टीका केली. ‘लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी माझ्या पतीला मारले’.

    रमा देवी यांनी पाटण्यातील गर्दबीनाग येथे आंदोलकांना संबोधित करताना राजदवर हल्लाबोल केला. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रीय जनता दल आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘नारी शक्ती’चा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे काम केले. दुसरीकडे, बिहारमधील सत्ताधारी केवळ आपल्या महिलांना सन्मान देण्याचे काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना रमा देवी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या नेतृत्वात जसे सरकार चालत आहे असाच कारभार चालू राहिला पाहिजे. नितीश कुमार काय करत आहेत? ते त्यांना देखील माहिती नाही. कारण आता सर्वकाही लालू यादवांच्या हातात आहे, असा आरोप त्यांनी केला.