भरदिवसा खासदारावर झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू, हत्येनंतर 'या' देशात खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये राजकीय हिंसाचाराचा छळ कमी होण्याचे नाव घेत नाही, आणि यामुळे देशातील स्थिती अधिकच गंभीर होत आहे. अलिकडेच खासदार बेनिटो अगस यांच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने देशभरात खळबळ उडवली आहे. याआधीही अनेक राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत, ज्यामुळे या हिंसाचाराची समस्या अधिक गडद होत चालली आहे. अमेरिकेच्या शेजारील या देशात राजकीय नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.
राष्ट्रपतींनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला असून, त्यांनी असे प्रकार थांबवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बेनिटो अगस यांच्या हत्येने केवळ एका नेत्याचे आयुष्यच नाही, तर लोकशाही प्रक्रियेवरही गडद सावली टाकली आहे.
या राजकीय हिंसाचारामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत आहे, हे उलगडणे आणि त्यावर कठोर कारवाई करणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराने मेक्सिकोमधील सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. लोकशाही प्रक्रिया टिकवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. विशेषतः, राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे. ही घटना मेक्सिकोच्या राजकीय व्यवस्थेवरील एक गंभीर प्रश्न निर्माण करते आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी सरकारकडून अधिक जबाबदारीने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर संशयाची सुई ‘या’ मुस्लिम देशावर; म्हणाले, ‘अमेरिका आणि इस्रायल मुख्य…
ही खळबळजनक घटना मेक्सिकोच्या वेराक्रूझ भागात घडली आहे. वेराक्रुझच्या ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने मेक्सिकोच्या डाव्या सत्ताधारी आघाडीचे खासदार बेनिटो अगस यांची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची पुष्टी केली आहे. सेंट्रल व्हेराक्रुझमधील खासदार बेनिटो अगस यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मेक्सिकन स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. हे उल्लेखनीय आहे की बेनिटो अगस हे मेक्सिकोच्या ग्रीन पार्टीचे खासदार होते, जे अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या मोरेना पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा भाग होते.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी खेद व्यक्त केला
मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सेंट्रल व्हेराक्रूझ येथे दिवसाढवळ्या ग्रीन पार्टीचे खासदार बेनिटो अगस यांच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या घटनेबद्दल त्यांना अत्यंत दु:ख आहे. खासदाराच्या हत्येप्रकरणी न्याय सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना वेराक्रुझच्या राज्यपालांसोबत काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना हे प्रकरण लवकरात लवकर उलगडण्यास सांगितले आहे.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काबूलमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटात तालिबान सरकार हादरले; ‘या’ मोठ्या नेत्याला बॉम्बने उडवले, हल्ल्यात 12 जण ठार
यापूर्वीही अनेक हत्या झाल्या आहेत
ग्रीन पार्टीचे खासदार बेनिटो अगस यांची मध्य वेराक्रूझमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मात्र याआधी मेक्सिकोतील ग्युरेरो येथे महापौर अर्कोस यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अर्कोसचे महापौरपद स्वीकारल्यानंतर सहा दिवसांतच त्यांची हत्या झाली.
शहराच्या नवीन सरकारचे सचिव फ्रान्सिस्को तापिया यांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर तीन दिवसांनी महापौर अर्कोसचा मृत्यू झाला. मेक्सिकोमध्ये हायप्रोफाईल लोकांच्या हत्येने देशात खळबळ उडाली होती. त्याच वेळी, 2 जून 2024 रोजी मेक्सिकोमध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान सुमारे सहा उमेदवारांची हत्या करण्यात आली होती.






