Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : “संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण…; शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

जेष्ठ नेते शऱद पवार यांनी सलग तिसऱ्यांदा खासदारकीची शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. शरद पवारांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 05:46 PM
MP Supriya sule social media post for sharad pawar rajyasbha oath

MP Supriya sule social media post for sharad pawar rajyasbha oath

Follow Us
Follow Us:

Maharashtra Politics : बारामती : महाराष्ट्रासह चार राज्यांतील 19 सदस्यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारे आणि माया इनावते यांनी राज्यसभेची शपथ घेतली आहे. यामध्ये शरद पवारांनी घेतलेली शपथ ही लक्षवेधी ठरली. व्हीलचेअरवर येऊन त्यांनी शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर खास भावनिक पोस्ट लिहिली आहे.

शरद पवार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी शपथ घेतली आहे. यानंतर खासदार सुळे यांनी त्यांना अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, कृतज्ञ… आदरणीय पवार साहेब यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी यावर्षी संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आता 60 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी यापुर्वी सहा वेळा विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत तर राज्यसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षीपासून सलग तिसरी टर्म ते राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत, असे खासदार सुळेंनी लिहिले आहे.

हे देखील वाचा : शरद पवारांची जिद्द अन् चिकाटीचे सर्वत्र कौतुक; व्हीलचेअरवरुन घेतली राज्यसभेची शपथ

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “सन 1967 साली सुरु झालेला हा अविजीत प्रवास आजही कायम सुरु आहे. त्यांच्या प्रदिर्घ राजकीय तथा संसदीय अनुभवाचा देशाला नेहमीच फायदा होईल हा विश्वास आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. यासोबतच या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारी, त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी बारामतीची जनता, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक आणि देशभरातील जनतेचे मनापासून आभार. आपण साहेबांना दिलेली साथ आणि दिलेले प्रेम ही आमच्यासाठी अमूल्य असा ठेवा आहे. मनापासून धन्यवाद.” अशी भावनिक पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे.

कृतज्ञ… 🙏
आदरणीय पवार साहेब यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी यावर्षी संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आता 60 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी यापुर्वी सहा वेळा विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत तर राज्यसभेत दोन वेळा… https://t.co/mLNnvA5p0j
— Supriya Sule (@supriya_sule) April 6, 2026

हे देखील वाचा : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली

ज्योती वाघमारेंनी वेधले लक्ष

चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा पेहराव केला होता. कपाळावर आडवं कुंकू, नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेतलेल्या ज्योती वाघमारे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. हातामध्ये संविधान घेऊन त्यांनी शपथ घेतली. त्यांनी शपथविधीवेळी महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती व उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. आणि ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले.

Web Title: Mp supriya sule social media post for sharad pawar rajyasbha oath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • MP Supriya Sule
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ
1

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ

‘सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका’; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका’; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?
3

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4

शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.