
Mumbai Police, Viral Video, Raj Thackeray, Abhijeet Dipke,
Mumbai Police Viral Video: मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्याने “खिशात 50 ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या नंतर या प्रकरणाने मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, त्याच पोलीस वाहनात उपस्थित असलेल्या एका तरुणाने समोर येत घटनेची दुसरी बाजू मांडली आहे.
व्हायरल व्हिडिओतील तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. “त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कठोर भाषा वापरली असली, तरी नंतर आमच्याशी अतिशय चांगले आणि मित्रत्वाने वागले. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ निलंबित करू नका,” अशी विनंती त्याने मुंबई पोलिसांकडे केली आहे.
या तरुणाने आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ठाकरे शिवसेनेच आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे आभार मानत एक व्हिडीओ शेअर केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या हस्तक्षेपामुळे त्यांची सुटका झाली. दावा करत त्याने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तरुणाने सोशल मीडियावर बोलताना सांगितले की, सोशल मीडियावर दिसणारा व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना सांगितले हा संपूर्ण घटनाक्रम दाखलेला नाही. संबंधित तरुणाने त्यावेळी घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. “मी स्वतः त्या गाडीत होतो. सुरुवातीला परिस्थिती तणावपूर्ण होती, पण नंतर आम्ही एसी लावण्याची विनंती केल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने एसी सुरू केला. प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी गाडीत गाणीही लावली. त्यामुळे ते मनाने चांगले होते.”
विद्यार्थ्यांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा आम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवले. तुमचे आंदोलक मित्र तिकडे आंदोलन करत आहेत, जाऊन त्यांना जॉईन करा,” असे सांगत पोलिसांनी आम्हाला तिथे सोडले, असा दावा त्याने केला.
CJP Protest: आंदोलन जंतर-मंतरवर, फटका खिशाला! Ola, Uber, Rapido चे दर दुप्पट; मेट्रो स्टेशन बंद
“गणेशोत्सवासाठी त्यांची गरज आहे”
व्हिडीओच्या शेवटी या तरुणाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरील कारवाईबाबत सौम्य भूमिका घेण्याचे आवाहन केले. ” मुंबईत लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्या काळात मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याला जास्त दिवस निलंबित ठेवू नका.”
धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तनावर तीव्र टीका झाली होती आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, आता त्याच वाहनात उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाने पोलिसांच्या वर्तनाची दुसरी बाजू मांडल्याने या प्रकरणाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रकरणात पोलीस विभागाची कारवाई आणि पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.