Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे; NIA च्या तपासात मोठा खुलासा

गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2025 | 02:25 PM
Pahalgam Terror Attack: पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे; NIA च्या तपासात मोठा खुलासा
Follow Us
Follow Us:

श्रीनगर: गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने अनेक महत्वाची पावले उचलून पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते.

मात्र हल्ला करण्याच्या दृष्टीने 15 एप्रिल रोजीच दहशतवादी काश्मीरमध्ये दाखल झाले असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी देखील मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यासाह आणखी 3 ठिकाणी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. बैसरन खोरे, अरू खोरे, एम्यूजमेंट खोऱ्यात देखील हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र तिथे असलेल्या सुरक्षेमुळे त्यांना हल्ला करता आला नाही.

22 एप्रिल रोजी टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पहालगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना मारण्याआधी त्यांना त्यांचा धर्म विचारून गोळी मारण्यात आली. या हल्ल्यात 5 दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यामध्ये 2 स्थानिक आणि 3 पाकिस्तानी समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

तपास यंत्रणेने आतापर्यंत अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. तर 188 जणांना ताब्यात घेतले आहे. 20 ओव्हर ग्राउंड कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे.

सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान भारताने आता पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक, ओद्योगीक कोंडी होणार आहे.

Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘चिनाब’चे पाणी रोखले

भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने  चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

नाक दाबताच पाकिस्तान बरळला

भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे. आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे. पाकिस्तानी पीएमओच्या निवेदनात सांगण्यात आले की, पाकिस्तान भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याच्या अधिकाराचा वापर करेल. ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतावर पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला.

 

Web Title: Nia investigation at pahalgam terror attack terrorist changed the plan jammu kashmir india pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • india
  • jammu kashmir
  • NIA Team
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
2

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”
3

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”

One Point One Solutions: वन पॉइंट वन सोल्युशन्सची दमदार कामगिरी; Q1 मध्ये उत्पन्न 129.4% वाढून 158.32 कोटींवर
4

One Point One Solutions: वन पॉइंट वन सोल्युशन्सची दमदार कामगिरी; Q1 मध्ये उत्पन्न 129.4% वाढून 158.32 कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.