ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा
शुक्रवारी (२० फेब्रुवारी) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी १९७७ च्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट अंतर्गत जगावर लादलेल्या टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द केले होते. ६-३ अशा बहुमताने अध्यक्ष ट्रम्प यांचा विविध देशांतून येणाऱ्या मालावर लागू केलेला टॅरिफ (Tariff) न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे म्हटले. न्यायालयाने सांगितले की, अशा प्रकारे टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांना दिलासा मिळाला होता.
मात्र ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र टीका केली. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयावर कडक शब्दात टीका करत निर्णय हास्यास्पद असल्याचे म्हटले. न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन तासांच्या आत त्यांनी जगावर १०% कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
हा कर ट्रम्प यांनी कलम १२२ अंतर्गत १५० दिवसांसाठी लागू केला. त्यांच्या मते, न्यायालयाने त्यांचा निर्णय रद्द करु अमेरिकेत मोठे संवैधानिक संकट उभे केले आहे. दरम्यान आता ट्रम्प यांनी १२२ कलम अंतर्गत लागू केलेला कर हा १० वरुन १५% पर्यंत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा भूकंप आला आहे.
ट्रम्प यांचे हे टॅरिफ केवळ शत्रू देश चीन पुरते मर्यादित नसून, भारत, युरोपीय देशांसारख्या धोरणात्मक मित्र राष्ट्रांवरही लादले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेत आयात केलेल्या वस्तूंची किंमत वाढून सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. तसेच परिणामी इतर देशही अमेरिकेन उत्पादनांवर प्रचंड कर लादू शकतात. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे.
भारतासाठी हा निर्णय काहीसा दिलासादायक आहे. कारण ट्रम्प यांनी व्यापार करारानंतर भारतावर लादलेले १८% टॅरिफ न्यायालयाच्या निर्णयामुळे शून्य झाले आहे. मात्र १५ टक्के टॅरिफची टांगती तलावर पुन्हा लटकत आहे. यामुळे भारताच्या कापड, दागिने, आणि आयटी क्षेत्रातील निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
US President Donald Trump posts – “…I, as President of the United States of America, will be, effective immediately, raising the 10% Worldwide Tariff on Countries, many of which have been “ripping” the U.S. off for decades, without retribution (until I came along!), to the… pic.twitter.com/kFZQJiJNnq — ANI (@ANI) February 21, 2026
सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ
Ans: ट्रम्प यांनी १२२ कलम अंतर्गत लावलेले टॅरिफ १०% वरुन १५% पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून अनेक देशांनी अमेरिकेला लुटले आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी जगावर टॅरिफ लादले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच इतर देशही अमेरिकन उत्पादनांवर टॅरिफ लादू शकतात.






